Tuesday, March 2, 2010

आयुष्य...
कधी कौलांवरुन ओघळणार्‍या पागोळ्यांगत
कधी खळखळणारा निर्झर अविरत......
कधी बहरलेला गुलमोहोर अंगणीचा
कधी कोमेजला जीव उमलत्या कळीचा......

कधी दवात भिजली चिंब कोवळी पाती
कधी सावरलेला अळवावरचा मोती......
कधी रंगभरले इंद्रधनू आकाशीचे
कधी नुसतीच उलगडणारी कोरी पाने.....

कधी वार्‍यावर वाहणारी मंद धुंद बासरी
कधी तहानलेल्या चातकाची आरोळी......
कधी थवा पक्ष्यांचा दूरदेशी जाणारा
कधी गरुड एकला ऊंच झेपावणारा.....

कधी सतत बोचणारे काटे
पांघरता शाल मखमली
कधी अनवाणी चालून थकता
त्रुप्त करणारी सावली......

5 comments:

  1. it's good ...but 1 sentence of last paragraph is not appropriate ...basri never flow with air..the voice comes out of it flows...see if u can modify with...Presiii

    ReplyDelete
  2. considering the fact that, this is being your early efforts to write "KAVITA", i dont want to let you down. so, gr88888888, keep it up....GOD BLESS YOU.
    hahahahahahaah.................
    OLAKHKONILIHILEEAAHEHICOMMENT.

    ReplyDelete