Sunday, August 29, 2010

Saturday, August 7, 2010

Wednesday, July 28, 2010

Tuesday, June 22, 2010

तुझ्या माझ्यातली अंतरं
मनाला हूरहूर लावणारी
आठवणींमधे भिजणारी मी
अन् बाहेर शांत बरसणार्‍या सरी

Thursday, June 10, 2010

Wednesday, June 9, 2010

राग, प्रेम, लोभ, खंत हे सारं

मी सहसा व्यक्त करत नाही

पण म्हणून माझ्यातलं त्यांचं अस्तित्व

नाकारता येत नाही...

Friday, May 28, 2010

Tuesday, May 25, 2010

Monday, May 24, 2010

Thursday, May 20, 2010

देहामधे कुठेतरी दडलेलं
इवलंसं मन
त्यामधे दाटणारी मात्र
तुझी आभाळाएवढी आठवण.
तु़झं फक्त असणंच
माझ्यासाठी बरंच काही असतं
आणि तू नसताना मात्र
माझं असं इथे काहीच नसतं...

Friday, April 30, 2010

Wednesday, April 14, 2010

Saturday, April 10, 2010

Tuesday, April 6, 2010

Friday, March 19, 2010

Friday, March 5, 2010

Wednesday, March 3, 2010

Tuesday, March 2, 2010

आयुष्य...
कधी कौलांवरुन ओघळणार्‍या पागोळ्यांगत
कधी खळखळणारा निर्झर अविरत......
कधी बहरलेला गुलमोहोर अंगणीचा
कधी कोमेजला जीव उमलत्या कळीचा......

कधी दवात भिजली चिंब कोवळी पाती
कधी सावरलेला अळवावरचा मोती......
कधी रंगभरले इंद्रधनू आकाशीचे
कधी नुसतीच उलगडणारी कोरी पाने.....

कधी वार्‍यावर वाहणारी मंद धुंद बासरी
कधी तहानलेल्या चातकाची आरोळी......
कधी थवा पक्ष्यांचा दूरदेशी जाणारा
कधी गरुड एकला ऊंच झेपावणारा.....

कधी सतत बोचणारे काटे
पांघरता शाल मखमली
कधी अनवाणी चालून थकता
त्रुप्त करणारी सावली......

Photo Courtsey