Friday, August 5, 2011

Saturday, July 23, 2011

Friday, June 24, 2011

Monday, May 23, 2011

आपली शाळा

घंटा झाली, रेकॉर्ड वाजली,
पुन्हा एकदा शाळा भरली....!
वर्ग भरले, सूचना मिळाल्या,
प्रार्थना झाली, बाई आल्या....!
कोणी विशितले,
कोणी तिशी- चाळिशितले,
तरी सूर एकच, अर्थात..
"एक साथ नम...स्ते...!"
........

वर्ग तेच, बाकडी तीच,
आणि जमलेली मुलंही तीच.
पण शाळा सोडून
बराच काळ लोटला होता,
प्रत्येकजण स्वतःच्या पायावर
उभं राहू पाहत होता.
तरीही तोच आनंद आणि उत्साह
जणू शाळेचा पहिला दिवस....!
बाईंनी विचारलं,
"मुलांनो आज आपण काय करूया?"
आणि मुलं चक्क म्हणाली,
"बाई, तुम्ही आम्हाला परत शिकवा..!"
...........

चित्रकला वर्ग, संगीत कक्ष,
भूगोल दालन आणि प्रयोगशाळा,
शिक्षिका कक्ष, संगणक कक्ष, कचेरी,
सभाग्रुह, ग्रंथालय आणि टिळकांचा पुतळा
सारं काही जसच्या तसं,
आठवणीत साठवलेलं
ओळ्खी पाळ्खी, खेळ आणि कॉतुक
ह्यात आजची शाळा संपली....!
पण बाबूचा व. पा. स. पा. नसेल
तर ती शाळा कसली.....?
........

शाळा सुटली
पण पाय निघत नव्हता.....!
कारण शाळेच्या 'ह्या वास्तूतला'
प्रत्येकाचा शेवटचा दिवस होता !
मग काय? "आपल्या शाळेचा"
प्रत्येकाने डोळ्यानेच फोटो काढला,
इथे आलेला एक एक जण
आजही बरंच काही सोबत घेऊन गेला....!

Friday, May 20, 2011

हजारो ख्वाईशे थी
मंजील तक पोहोचनेकी,
मकाम तो कई आए
पर मंजील कही नही.
मंजील को अंजाम देने
हम निकल पडे निहथ्थे,
ऑर थोडी दूरीपेही
खडा था, आखिरी मकाम!