Sunday, February 5, 2017

एक माशी आली कुठुनशी
स्वयंपाकघरात शिरली !
भिरभिर भिरभिर करत
सारी भांडी हुडकू लागली !

दुधाची पातेली, तुपाची तपेली
भाज्यांची घमेली अन पाण्याची बाटली
साऱ्यांवर बसून ऐटीत
जीभल्या चाटू लागली !

आजी आली तिकडून
पेपर हाती पकडून
माशीला ती म्हणे,
"थांब हो आता कुठे जाशी?"

उडाली भर्रकन माशी
गाठली आजोबांची ऊशी,
नाकावर त्यान्च्या बसता
त्यांची झोपमोड हो झाली!

दादा होता खेळत
त्याच्या कानी ती कुजबुजली
आवाजाने होता त्रस्त
तलवार त्याने उपसली!

सारी कसरत बघूनी
मी हसलो पोट धरुनी,
शर्टात माझ्या शिरुनी
तिने माझी फजिती केली!