दिस मावळतीला येई
सूर्य जाई माघारा
क्षितिजावर केसारलाली
अवघिकडे संध्याछाया
घरा परतोनि जाई
थवा पाखरांचा
नदितिरावर कुणी बैरागी
ध्यानस्थ बसलेला
इतक्यात चुकार टिटवी
लावी घोर जीवाला
पौर्णिमेच्या चंद्राचा
डोहात चांदणसडा
तरंग उठती
संथ प्रवाही
कधी चंचल,
परी अचल नाही
कानमंत्र ती देई जणू
वीचल ध्यानस्थाला.